एक तरी मैत्रीण असावी

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...

आयुष्य

आयुष्य म्हणजे कटकट..

जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं

सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं


आयुष्य म्हणजे वणवा....

इथे वेदनांना घेउन जळावं लागत

पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं


आयुष्य म्हणजे अंधार...

इथे काळोखात बुडाव लागतं

परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं


आयुष्य म्हणजे पाऊस....

आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं

कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं


पण ...आयुष्य हे असेच का ?

मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य

जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.

आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

मैत्री................................................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मैत्री कधी ठरवून होत नाही
आपण आपल्या वाटवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात....

एकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतात
आपल्या नकळत कुणाची तरी वाट आपल्या वाटेला येऊन मिळते आणि
नकळत आपण एकाचवाटेवरुन समांतर चालु लागतो...

नंतर जवळ येतो
एकमेकाला आधार देतो
एकमेकाला सोबत करतो
एकमेकाची दु:खे वाटुन घेतो
आणि आनंदाचे क्षण साजरे करतो...

मैत्री अशी होते..!

काय जादु असते मैत्रीत!
मैत्री शिववते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलुन टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास...

कधी कधी वाटतंसमुद्राच्या काठावर शिंपल्याची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखंत्यात खेळत असावं
शिंपलेच - शिंपले ....विविध रंगाचे... विविध आकाराचे ... विविध प्रकारचे...सहजपणे त्यातला एक शिंपला उचलुन घ्यावा
अलगद उघडावाअन त्यात मोती सापडावा ....

hi friends i am starting to a bloging